श्रावण आला गं सखे श्रावण आला!

लेवून हिरवा साज, सृष्टी सजे नववधू परी
मांगल्याच्या अन् समृद्धिच्या धारा घेऊनी बरसती श्रावणसरी!!
निसर्ग हा जणू मनोमन हर्षला.......
श्रावण आला गं सखे श्रावण आला!

येता वर्षासरी,चिंब आठवही दाटले ऊरी
मन वेडे , घेई हिंदोळे , माझिया गे माहेरी
पंचमीचा गं बांधुन झुला ........
श्रावण आला गं सखे श्रावण आला!

होता ऊधळण रंगाची ईंद्रधणुतुनी
वाटे...कुणी काढिली सुबक रांगोळी ही आकाशि अंगणी
य रंगाचे रंग मोहविती तुला अन् मला
श्रावण आला गं सखे श्रावण आला!

निळ्या घनांच्या साश्रु नयनांनी हे कसे, मनी लाविले गं पिसे
आभाळमाया दाटोनी येई जशी माझी माय असे
आठवांनी का गं या पदर तुझा भिजला .......
श्रावण आला गं सखे श्रावण आला!

........ आरती

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!