
स्त्री अन् पुरुष , शब्दातले अंतर
जरी जाहले एक युगांतर!
रघुराम ना कुणी राहीला परी.....
अजुनही इथे मी वैदेही !!
मोडुन चौकट मळलेली ,
सोडुन वाट फुललेली.....
युवराज्ञी ! .... नसे,जानकी !
जनकासही मान्य नसे.......
अस्तित्व माझे निव्वळ मैथिली !!
असुनही लक्ष्मी - दुर्गा,
जिवन जगले बनुनि रमा....
महाराणी...... अहं , अर्धांगिनी !
रामातच आज परिट दडे....
अग्निदिव्यही मलाच घडे ,
अशी मी भुदेवी!!!
........ आरती
<><><><><><><><><><><><><><><><>><><><<><><><><><><><>
No comments:
Post a Comment