
शशिरजाची जरी मी तारका!
सहस्त्र चांदण्यातील जणू एक गणिका.....
क्षुल्लक इतुकेच माझे आकाश!
म्हणुनिया रिता मनाचा अवकाश!!
या अवकाशि जरी बंड पेटले
अशक्यप्राय तरी, मुर्तरुप घडेल!
का आस भास्कराची माझिया मना?
रजनीकांता..... करु कशी प्रतारणा!!
असले जरी हे खेळ मनीचे...
तरी बोच मनास, संस्काराचे!
पतिव्रता..... मी एक रमणा !
तु एक पापिण,मन का ग्वाही देते?
........... आरती
<><><><><><><><><><><><><><><><><><><><><><><>
No comments:
Post a Comment