महीला दिनानिम्मित्त केलेले सर्वेक्षण.........

अजून किती वर्षे शिकणारच आहात ?
नोकरीचेही बघा आता......
आजकाल वधू नोकरीवालीच लागते ,
नाहीतर सर्व हुंड्यापायी नडते !

......... इति पिता!

अगं, आँफिस मधे महीला दिन आहे,
तिथे हजेरी....म्हणजे प्रतिष्ठा वाढते!
तुला त्यातलं काय कळ्तय म्हणा.....
घरात बसुन ,झोपाच काढते !

..........इति पती !

अगं आई, तुला काय काम आहे ?
आमचं आजचं shedule तर jaam आहे!
नातवालाच तर सांभाळतेस ना.....
कुठे दुसर्‍या कुनाची गुलाम आहेस ?

.......... इति पुत्र!!

--------- आरती
-----------------------------------------------

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!