तिची स्वप्ने, तिच्या कल्पना
जाणिले ना कुणी , तिच्या मना
अस्तित्वाची लढाई लढवेना....
जगणे बांडगुळापरी !
पिता पती आणि पुत्र
म्हणायला ही नाती मात्र
स्त्रि - जन्माचे भाग्य ठरतसे......
या तिन पुरुषांवरी !
जगणे बांडगुळापरी !
वाढेन का ती वटवृक्षा जैशी........
आकाशि झेपवाया !
का लतिकेचेच भाग्य नशिबी ?
विसबूंन दुसर्यावरी रहाया !
हुरहुर ही दाटे ऊरी !
जगणे बांडगुळापरी !
जगणे बांडगुळापरी !
....... आरती
..............................................
No comments:
Post a Comment