आजमावून पहावी, प्रतिक्षेतीलही हुरहुर.....
ती येईपर्यंत मनात विचारांचे काहूर
लटकेच रागावणे , नजर वळवून....
मग तिच्या विनवण्या अन् दाटून आलेला ऊर!!
क्षणिकच बसावे जरासे अडून....
तिचे भरले डोळे अन् चेहरा जाताच पडुन
अनुभवावी तिच्या प्रितीची चाहुल...
आणि हळूच हसावे..... हातात हात घेऊन!!
आल्या आल्याच तिची जण्याची लगबग
डोळ्यात साठवावी, तिच्या जिवाची तगमग...
तिचे बोल जणू , अमृतकलश !
तिच्यातच विरघळावे विसरुन सारे जग!!
असावी कुणी प्रेयसि अशी.....
दुपारच्या ऊन्हात चांदणरात जशी !
स्वप्न येईल का हे सत्यात ऊतरुन ?
जिवनात एकदा प्रेम पहावे करुन!!!!!
...... आरती
....................................................
No comments:
Post a Comment