तो अन् ती!!!!!!!!


त्याचं अन् तीचं लगीन जमलं,
कांदे पोह्यांच्या रीतीनं!
चोरटे कटाक्ष टाकूनच पाहिलं,
सार्‍यांच्या भीतीनं.....

त्याला तर ती ऐश्वर्‍या च भासली
डोळ्यात तीच्या निळाई दिसली....
तीच्या बांध्याची गोलाईमग जरा नजरेआडच केली!

त्याचं एकूणच बावळट ध्यान
तिच्याही नजरेनं टिपलं......
मुठितच राहिल जन्मभर
असं म्हणून मना समजविलं !


एकदाच्या अक्षता पडल्या डोईवर
दोहोंसाठी जणू स्वर्गच भूईवर
राजा राणीच्या संसार्वेलीला बहरहि आला अर्धा डझनभर !

आता तीच्या गोलाईचं एक पूर्ण वर्तुळ झालंय
त्याच्याहि डोक्यावर पायवाटेचं मैदान झालंय.....
उडुन गेलाय केव्हाच सुगंध प्रेमाचा गुलकंदी
रोजच छेडतायेत् दोघे तु तू - मै मै ची जुगलबंदि!

आजहि तो आहे स्वप्न सुंदरिच्या शोधात
अन् परिकथेतिल राजकुमार भुरळ घालतोय तीच्या मनात
पण तरीहि निजताहेत निवांत ते एकमेकांच्या कुशीत
मनातले वादळ घुमतय कांदे पोह्यांच्याच बशीत!!!!!!



--------------आरती
.......................................................................

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!