दोन जीव अनोळखी
झाले सखा अन् सखी
नाते प्रेमाचे जडले अंतरिचे !!
माय-बाप आठवेना
बोल कुनाचे पटेना
वेध मनास लागले नवसंसाराचे !!
राजा-राणीचेच घर
नको कुणी अडगळ
स्वप्न नयनि पडले
हे सुखाचे !!
भर ओसरता प्रेमाचा
प्रश्न पडतो उद्याचा
तिच्या चंद्रासम चेहर्यात
भास भाकरीचे !!
..... आरती
>>
No comments:
Post a Comment