कसे कळेना........... कळत नकळत सारे घडले!!!!!
शांत सागरी मनाच्या,उठवून तरंग
तुझे मन का किनार्यावरच राहीले!
मी मात्र वाहुन गेले,चिंब झाले,
पुर्णपणे तुझ्यात बरसले!!!!
कसे कळेना........... कळत नकळत सारे घडले!!!!!
तुला पाहिले,तुझी जाहले, तुलाच जाणिले,
तुझ्यात हरवून स्व:ताला,
माझी मीच ना राहिले!!
कसे कळेना........... कळत नकळत सारे घडले!!!!!
तुझीच आस,तुझाच ध्यास, मनी माझ्या!!
तूच जिवनि,तूच नयनि,तूच स्वप्नी माझ्या!
तुझेच नाव जपोनि सारे जिवन जगले!!
कसे कळेना........... कळत नकळत सारे घडले!!!!!
..... आरती
No comments:
Post a Comment