ओंजळीतले आभाळ!!!


हवंय मला एवढंस् आभाळ.......
नजरेत सामावेल ईतकच.
हवंय मला एवढंस् आभाळ.......
कवेत मावेल ईतकच.
अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या
त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!

हवंय मला एवढंस् आभाळ.......
उंच भरारण्याईतकं.
हवंय मला एवढंस् आभाळ.......
प्रकाशित सूर्यकिरणांईतकं.
अन् हव्यात सार्‍या दिशा उजळ्लेल्या......
त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!

हवंय मला एवढंस् आभाळ.......
माझ्या माणसांच्या आभाळ्मये ईतकं
हवंय मला एवढंस् आभाळ.......
सार्‍यांच्या छ्त्रछाये ईतकं
अन् हवंय मला एवढंस् आभाळ.......
त्या सार्‍या आभाळाईतकंच!!!

..... आरती
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!