'रम्य ते बालपण' असे प्रत्येक कवी म्हणतो!!!!


'रम्य ते बालपण' असे प्रत्येक कवी म्हणतो,
पण सगळ्यांचेच ते असते का हा प्रश्न मनी सलतो!!

मजुराच्या एका झोपडीसमोर,पाहीला एक निरागस चेहरा,
थोडा भांबावलेला, थोडा घाबरलेला!!
बाप आपल्या आईला का मारतोय?
म्हणून कोड्यात पडलेला!!
निरगसपणा या कळ्यांचा फुलण्यआधिच कोमेजतो!!
'रम्य ते बालपण' असे प्रत्येक कवी म्हणतो,


पोटाची खळगी भरण्यासठी,माय-बापानेच जुंपले कामाला,
पण तिथेही मोठं असल्याचा आव आणलेला!
बालपनीचा स्वछंदीपणा मनात असाच गाडुन जातो!
बालकामगारांचा प्रश्न हा असा एरणीवर येतो!!
'रम्य ते बालपण' असे प्रत्येक कवी म्हणतो!!!!!!


पण काय गरीबाच्याच घरात असा बालमनाचा बळी जातो?
मोठ्यांच्या घरात देखील दिव्याखाली अंधार असतो!
नेहमीच दडपणाखाली राहून, अन् अपेक्षांचे ओझे वाहून,
घरा घरातून कोवळा जिव रडतो!!
'रम्य ते बालपण' असे प्रत्येक कवी म्हणतो!!!!

......... आरती
....................................................

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!