मी माझे कुणा म्हणू?

अशाच एका निवांत क्षणी,
वाटले..... पहावा विचार करुन,
अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?

पण हाय!!! का असे विपरित घडले,
खरेच, माझे म्हणावे असे कुणीच ना वाटले!
असे कसे होईल? यात माझेच काही चुकले जणू!!!!

अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?

तसे सगळेच आहेत , आयुष्याच्या सोबतीला,
पण तरिहि मी एकटी, एकटीच या वाटेला!
रित्या ओंजळीचा या एकटेपणाच धनू!!

अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?

एकही माणूस ना जोडता यावा , इतक्या का कोत्या मनाची मी?
की मलाच ना कुनी जवळ केले, इतक्या कमनशिबाची मी?!!
काय हे असे कोडे सुटेना , आनखिनच गोंधळात मनू!!!!

अवति-भोवती बरेच जण,
मी माझे कुणा म्हणू?

......... आरती

No comments:

मी अबोली !

My photo
हवंय मला एवढंस् आभाळ....... नजरेत सामावेल ईतकच. हवंय मला एवढंस् आभाळ....... कवेत मावेल ईतकच. अन् हव्यात मला सार्‍या चांदण्या लुकलुकत्या त्या एवढ्याश्या आभाळाईतक्याच!