
डोळ्यात आसू
ओंठावर हासू....मंद !
सारे भुलले,ना कुणा समजले,
माझिया मनीचे द्वंद !
प्रेमळ अन् समजुतदार,
बोलणे जसे मधाळ गुलकंद!
बिरुदे चिटकली......
तयास जपण्याचाच छंद!
व्यसन जडले चांगुलपणाचे
स्तोम माजले, अंदाधुंद!
अस्मिता हरवली......
गृहीतकाचे रणकंद!!!!
......... आरती
.............................................................
No comments:
Post a Comment